|
नमस्कार मंडळी!
मराठी माणसाच्या या मराठीसृष्टीत
आपलं स्वागत. मराठी वेबसाईटस हा काही आता नाविन्याचा भाग राहिला नाही.
पण जवळपास १० वर्षांपूर्वी जेव्हा ही साईट प्रथमच सुरु झाली तेव्हा इंटरनेटवर
मराठी भाषा हे नाविन्यच होतं.
तेव्हापासून अगदी आजतागायत आम्ही इंटरनेटवरच्या
शेकडो साईटसना, सायबरशॉपी या संस्थेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचं पाठबळ
दिलंय... अगदी सुप्रसिद्ध वर्तमानपत्र `लोकमत'पासून ते अनेक छोट्या छोट्या
साईटसपर्यंत.
इंटरनेटवरच्या लाखो-करोडो पानांमध्ये मराठी
पाने किती असा आपल्याला कधी प्रश्न पडलाय का? आम्हाला असा प्रश्न वारंवार
पडतो आणि आम्ही अस्वस्थ होतो. काही शेकडा वेबसाईटस किंवा ब्लॉग्स आणि काही
हजार पाने याच्यापुढे काही आपल्या मायबोली मराठीची उडी गेलेली नाही. ४-५
वर्षे सलगपणे तग धरुन चालू असलेल्या मराठी साईटस अगदी हाताच्या बोटावर
मोजण्याइतक्याच. मराठीसृष्टी ही त्यातील एक. विकिपिडियामध्ये मराठी भाषेबाबत पाने उपलब्ध
आहेत.
मराठीसृष्टी या
पोर्टलचे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन म्हणजे मराठीतील अनेक नामवंत,
प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा
आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश. या संदर्भकोशाचे काम गेले सुमारे
६ महिने सुरु असून आतापर्यंत २००० व्यक्तिमत्त्वांची माहिती या संदर्भकोशासाठी
संकलित झाली आहे. या संदर्भकोशाचे विधिवत लोकार्पण लवकरच होणार आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध मराठी व्यक्तींविषयी
माहिती, त्यांच्याबाबत इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या साईटच्या लिंक्स
तसेच छायाचित्रे, ध्वनीफीती, चित्रफीती यांचा प्रचंड मोठा संग्रह
हे या व्यक्ती-संदर्भ कोशाचे वैशिष्ट्य आहे. अशाप्रकारचा मराठी व्यक्तींचा
मोठा संदर्भकोश असलेली ही एकमेव वेबसाईट आहे.
......अधिक
माहितीसाठी क्लिक करा
|
|
त्यावर आता नियमितपणे भरही पडतेय. मात्र अनेक कारणांमुळे विकिपिडिया
आपली विश्वासार्हता गमावताना दिसतेय. मंडळी, मराठी वेबसाईटसना मिळणारा प्रतिसाद
सध्या आपल्याला भरपूर वाटत असला तरीही तो खरंच भरपूर आहे का? याचा विचार
करायलाच हवा. सध्या उपलब्ध असलेल्या सगळ्या साईटस या काही विषय डोळ्यासमोर
ठेउन तयार केलेल्या आहेत. सोशल नेटवर्कींग हा या बहुतेक सर्व साईटसचा मुख्य
उद्देश... आणि अर्थात तो उद्देश चांगलाच आहे. पण तेवढ्यानेच पुरे आहे का?
मराठी साईटसवर नियमितपणे किती लोक येतात ते पहायलाच पाहिजे ना?
तुम्हाला लिखाणाची आवड
असेल तर आम्हाला जरुर कळवा. आपल्यासाठी सर्व ती लेखन-आयुधे घेउन आम्ही
तुमच्याकडे येउ. इंटरनेटवरच्या लेखनसामुग्रीची ओळखही आपण लवकरंच करुन घेणार
आहोत.
साईटवरुन एक फेरफटका मारा.....
बघा आतमध्ये काय काय आहे ते! |