| संत
तुकाराम .... www.tukaram.com |
| या संकेतस्थळावर संत तुकारामांची
संपूर्ण अभंगगाथा इंटरनेटवर उपलब्ध आहे. तुकारामांचे तब्बल साडेचार हजार
अभंग या संकेतस्थळावर मूळ मराठीत वाचायला मिळतातच, शिवाय या महान संताचा
परिचय करून देणारे हिंदी, स्पॅनिश, राशियन, जर्मन आणि इंग्रजी भाषेतील
लेखही या संकेतस्थळावर आहेत. याचबरोबर तुकारामाच्या गाथेचा विविध भाषांतील
अनुवादही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. |
| ........ |
| ग दि
माडगूळकर .. गदिमा ... www.gadima.com |
| महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी
म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, ते ग दि माडगूळकर अर्थात गदिमाही या
सायबरविश्वात आपल्याला भेटतात www.gadima.com या संकेतस्थळावर. १३ ऑक्टोबर
१९९८ रोजी गदिमांचे नातू श्री सुमित्र माडगूळकर यांनी हे संकेतस्थळ सुरु
केले. आजवर लाखो सायबरयात्रींनी या संकेतस्थळास भेट दिली आहे. या संकेतस्थळावर
संपूर्ण गदिमा..... अगदी दृक-श्राव्यासहित उपलब्ध आहेत. |
| ........ |
| सुरेश भट... http://www.sureshbhat.in
|
| गझल या काव्यप्रकाराला मराठीत व्यापक प्रमाणात प्रसिद्ध करणारे गझलकार सुरेश भट
यांच्याविषयीचे http://www.sureshbhat.in हे संकेतस्थळ. या संकेतस्थळावर आता अनेक नव्या दमाच्या गझलकारांच्या रचना उपलब्ध आहेत. |
| पु. ल. देशपांडे... www.puladeshpande.net
|
| महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असणार्या पु. ल. देशपांडे
यांच्याविषयीचे www.puladeshpande.net हे संकेतस्थळ निर्माण झाले आणि
अल्पावधीतच हे संकेतस्थळ म्हणजे पु. ल. प्रेमींचा कट्टाच बनले. |
| वि स खांडेकर... http://www.vskhandekar.com
|
| ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पहिले मराठी साहित्यिक वि स खांडेकर यांच्याविषयीचे www.vskhandekar.com हे संकेतस्थळ. |