मराठीसृष्टी : मराठी माणसाच्या या मराठीसृष्टीत आपलं स्वागत! (Marathi Srushti)







मराठीसृष्टीचे लेखक 
राजीव तांबे
प्रदीप निफाडकर
प्रकाश पोहरे
निनाद प्रधान
किशोर कुलकर्णी
कालीदास वांजपे
सूर्यकांत डोळसे

मराठी इ-मेल
आपल्या आवडीच्या कळफलकाचा (keyboard) वापर करुन मराठीत इ-मेल पाठविण्याची सोय.

व्यक्ती-संदर्भकोशाच्या कामात आपलाही सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. यासाठी येथे क्लिक करा .


सेवा-सुविधा

मराठीत लेखन करायचं म्हणजे फारच कठीण.. किचकट काम... असाच एक गैरसमज अनेकजणांमध्ये आहे. एके काळी ते तसं होतं पण आता नाही. संगणकावर मराठीत काम करणं कठीणही राहिलेलं नाही आणि किचकटही. यासाठी अनेक आयुधं आता आपल्या हातात आहेत. यातली काही मोफत आहेत तर काही विकत घ्यावी लागतात. आता तुम्ही म्हणाल की मोफत ऊपलब्ध असताना विकतची का बरं घ्यायची? पण खरंतर सगळ्यांची आपआपली वैशिष्ट्यं आहेत आणि त्यांचीच ओळख या विभागात होईल.

आपल्यासाठी मराठीतून सोप्या पद्धतीने इ-मेल पाठविण्याची सोय येथे उपलब्ध आहे. आपण आपल्या आवडीच्या कळफलकाचा (keyboard) वापर करुन मराठीत इ-मेल पाठवू शकता.... यासाठी येथे क्लिक करा

इंटरनेटवर काम करण्यासाठी युनिकोडचा वापर आता सर्वत्र होतोच आहे. हे युनिकोड म्हणजे काय तेही जाणून घेउया. युनिकोडचा वापर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक आहे पण पुढे काय? इंटरनेटव्यतिरिक्तच्या कामासाठी युनिकोडचा खरंच उपयोग होतोय का हेसुद्धा अभ्यासायला हवेच की. प्रकाशन व्यवसायात साधारणपणे पेजमेकर आणि क्वार्क एक्सप्रेस ही दोन सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणात वापरली जातात. या सॉफ्टवेअरमध्ये युनिकोडमध्ये काम करायची सोयच नाही मुळी. युनिकोड-युनिकोडचा पाढा वाचणार्‍या मंडळींनी याचाही विचार करायला पाहिजे.

युनिकोडचे महत्त्व आहेच पण तसेच महत्त्व युनिकोडव्यतिरिक्तच्या फॉन्टसचेही आहे हे विसरुन चालणार नाही.

१९९५ साली जेव्हा भारतीय भाषांमधे इंटरनेटसाठी तंत्रज्ञान घेउन आम्ही जगासमोर आलो त्यावेळेपासून हेच म्हणत होतो की भारतीय भाषांसाठी मोठ्या प्रमाणावर सेवा-सुविधा उपलब्ध झाल्या तरच या भाषांना डिजिटल युगात मोठ्या संधी आहेत. मराठी, हिंदी, गुजराती या भाषांसाठी विविध सॉफ्टवेअर कंपन्यांनी तंत्रज्ञान बनविलेले आहेच. यामध्ये साध्या टायपिंगपासून स्पेलचेकर म्हणजेच मुद्रितशोधन, भाषांतरण वगैरे बर्‍याच गोष्टी आल्या. दुसरे म्हणजे, वर्षानुवर्षे वेगवेगळ्या फॉन्टसमध्ये बनविला गेलेला हजारो-लाखो पानांचा मजकूर आता इंटरनेटवर वापरायचा तर त्याचीही सोय हवी. अशी सोयही आता उपलब्ध आहे. भाषांतर वगैरेसारख्या बाबीही आता संगणकावर करता येतात. तेव्हा त्याचीही ओळख करुन घ्यायला हवी.

हेच सर्व आता आपल्यासाठी उपलब्ध होत आहे मराठीसृष्टीद्वारे. मराठीसृष्टीच्या ब्लॉगवर आपल्याला या विषयावर बरंच काही सापडेल. आणि त्याचबरोबर इतरांनीही लिहिलेल्या विविध साईटसवरच्या या संदर्भातल्या लेखांना आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणणार आहोत.

यासाठी नियमितपणे मराठीसृष्टीच्या या संकेतस्थळावर यायला हवे.

 

 

.......

आपल्या संगणकावर मराठीत सोप्या पद्धतीने काम करण्यासाठी फॉन्टफ्रीडम मायबोली वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.३९९/-

मराठी सॉफ्टवेअर्स 
युनिकोडमध्ये आपल्या संगणकावर मराठीत ऑनलाईन आणि ऑफलाईन काम करण्यासाठी, ऑर्कुट, ब्लॉग्स वगैरेवर मराठीत लिखाण करण्यासाठी आणि कोणत्याही सर्च इंजिनमध्ये मराठीतून सर्च करण्यासाठी फॉन्टफ्रीडम गमभन वापरा.
खास सवलतीची किंमत... केवळ रु.२००/-

मराठी लेख..... 
अभिवादन गुरूंना - (गुरूपौर्णिमा विशेष)
'बाभळीचे काटे' अचानक चर्चेत
मुंबईची दैना
संपूर्ण महाराष्ट्राचेच आरक्षण हवे !
सुलम उद्योग नोंदणी : अकारण भीती व अनास्था
खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका
शिक्षण क्षेत्रातील आणीबाणी जाहीर करणे बाबत शासनाला पत्र
नक्षलवादी आयपीएलची मस्ती उतरवतील का?
भारत बंद (वात्रटिका)
क्रिकेटला हद्दपार करणे हाच उपाय!


मराठी जगतातील घडामोडी 
बेळगावात तोंड दाखवण्याची लाज वाटते - छगन भुजबळ
इंदिरा गांधींनी शब्द पाळला नाही - कन्हैयालाल गिडवाणी
सीमा वादाबाबत पंतप्रधानांना साकडे
खैरलांजी हत्याकांडातील 'फाशी' टळली, सर्व दोषींना जन्मठेप
देशातील प्रस्तावित ‘सेझ’ प्रकल्पांपैकी ११ टक्के कोकणात!
 
© 2010 Langindia Infoservices Private Limited
 
 
Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
(Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)