मराठीसृष्टी : मराठी माणसाच्या या मराठीसृष्टीत आपलं स्वागत! (Marathi Srushti)







मराठीसृष्टीचे लेखक 
राजीव तांबे
प्रदीप निफाडकर
प्रकाश पोहरे
निनाद प्रधान
किशोर कुलकर्णी
कालीदास वांजपे
सूर्यकांत डोळसे

मराठी इ-मेल
आपल्या आवडीच्या कळफलकाचा (keyboard) वापर करुन मराठीत इ-मेल पाठविण्याची सोय.

व्यक्ती-संदर्भकोशाच्या कामात आपलाही सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. यासाठी येथे क्लिक करा .


मराठी व्यक्ती संदर्भकोशाच्या कामात आपला सहभाग अपेक्षित आहे.

www.marathisrushti.com या साईटचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्यिक, संत-महात्मे, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, कलाकार, उद्योजक, खेळाडू, पत्रकार, व्यावसायिक, राजकारणी अशा नामवंतांबरोबरच अनेक क्षेत्रातील अप्रकाशित, अपरिचित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा ऑनलाईन संदर्भकोश. मराठीसृष्टीतर्फे हाती घेतलेल्या या संदर्भकोशाचे काम गेली सुमारे ६ महिने सुरु असून आतापर्यंत २००० व्यक्तिमत्त्वांची माहिती या संदर्भकोशामध्ये उपलब्ध आहे. या संदर्भकोशाचे विधिवत लोकार्पण लवकरच होणार आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात गतकाळात होऊन गेलेल्या तसेच सध्या कार्यरत असलेल्या विविध कर्तृत्ववान मराठी व्यक्तींविषयी माहिती, त्यांच्याबाबत इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीपूर्ण साईटच्या लिंक्स तसेच छायाचित्रे, ध्वनीफीती, चित्रफीती यांचा प्रचंड मोठा संग्रह हे या संदर्भकोशाचे वैशिष्ट्य असेल. त्याचसोबत सध्याही विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अगदी सामान्यजनांचीही माहिती या संदर्भकोशात उपलब्ध असेल. वर्षअखेरपर्यंत विविध क्षेत्रातील एक लाखांहून जास्त मराठी माणसांची माहिती या संदर्भकोशामध्ये उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.

सेलिब्रिटींपासून सामान्य माणसांपर्यंत अशाप्रकारचा मराठी व्यक्तींचा एवढा मोठा संदर्भकोश असलेली ही एकमेव वेबसाईट आहे. याची झलक सध्या साईटवर उपलब्ध आहे. माहितीचा आवाका एवढा मोठा आहे की या माहितीचे वर्गीकरण करुन ती योग्य स्वरुपात वाचकांपर्यंत नेणे यासाठी बराच कालावधी आणि श्रमाची आवश्यकता तर आहेच पण यासाठी येणारा खर्चही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच बरीच माहिती सध्या इंटरनेटवरच्या विविध स्त्रोतांच्या माध्यमातूनही जमा केली जात आहे आणि लिंक स्वरुपातही ती या संदर्भकोशाद्वारे वाचकांना उपलब्ध केली जात आहे.

वेबसाईटवर असलेल्या माहितीत भर टाकणारी काही माहिती कोणाही वाचकाकडे असल्यास त्याचासुद्धा या संदर्भकोशात अंतर्भाव करता येईल.

हे एक प्रचंड आव्हानात्मक काम आहे आणि मराठीसृष्टीच्या जिद्दी तंत्रज्ञांनी तसेच या प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्वांनीच ते पूर्णत्वाला नेण्याचा संकल्प केला आहे.

या कामात जनतेचाही सहभाग अपेक्षित आहे. या प्रकल्पात आपण खालीलपैकी कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ शकाल.

  • आपल्याला माहित असलेल्या व्यक्तींविषयी माहिती, छायाचित्रे, ध्वनिफिती वगैरे पाठवून.
  • या प्रकल्पासाठी आपण स्वत: आर्थिक मदत करुन किंवा मिळवून देउन.
  • या संदर्भकोशाच्या काही विभागांसाठी प्रायोजकत्त्व स्विकारुन.
  • संदर्भकोशासाठी भाषांतराचे काम स्विकारुन.
  • संदर्भकोशासाठी माहितीच्या लेखन / संपादनाचे काम स्विकारुन.
  • संदर्भकोशामध्ये आपल्या संस्थेची / व्यवसायाची जाहिरात देउन.

    या संदर्भकोशामध्ये प्रकाशित होणार्‍या माहिती संदर्भातील श्रेयनामावलीत आपल्या नावाचा सहभागही केला जाईल.

  • आपल्या संगणकावर मराठीत सोप्या पद्धतीने काम करण्यासाठी फॉन्टफ्रीडम मायबोली वापरा.
    खास सवलतीची किंमत... केवळ रु.३९९/-
    
    मराठी सॉफ्टवेअर्स 
    युनिकोडमध्ये आपल्या संगणकावर मराठीत ऑनलाईन आणि ऑफलाईन काम करण्यासाठी, ऑर्कुट, ब्लॉग्स वगैरेवर मराठीत लिखाण करण्यासाठी आणि कोणत्याही सर्च इंजिनमध्ये मराठीतून सर्च करण्यासाठी फॉन्टफ्रीडम गमभन वापरा.
    खास सवलतीची किंमत... केवळ रु.२००/-
    
    मराठी लेख..... 
    अभिवादन गुरूंना - (गुरूपौर्णिमा विशेष)
    'बाभळीचे काटे' अचानक चर्चेत
    मुंबईची दैना
    संपूर्ण महाराष्ट्राचेच आरक्षण हवे !
    सुलम उद्योग नोंदणी : अकारण भीती व अनास्था
    खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका
    शिक्षण क्षेत्रातील आणीबाणी जाहीर करणे बाबत शासनाला पत्र
    नक्षलवादी आयपीएलची मस्ती उतरवतील का?
    भारत बंद (वात्रटिका)
    क्रिकेटला हद्दपार करणे हाच उपाय!

    
    मराठी जगतातील घडामोडी 
    बेळगावात तोंड दाखवण्याची लाज वाटते - छगन भुजबळ
    इंदिरा गांधींनी शब्द पाळला नाही - कन्हैयालाल गिडवाणी
    सीमा वादाबाबत पंतप्रधानांना साकडे
    खैरलांजी हत्याकांडातील 'फाशी' टळली, सर्व दोषींना जन्मठेप
    देशातील प्रस्तावित ‘सेझ’ प्रकल्पांपैकी ११ टक्के कोकणात!
     
    © 2010 Langindia Infoservices Private Limited
     
     
    Technology and Hosting Services Provided by Mastermind Technologies
    (Best viewed @ 1024x768 Resolution and up,Recommended Browser IE 6.0 +)