ब्लॉगस्पॉट, ब्लॉगर वगैरेसारखे अनेक ब्लॉग्स असतानाही आम्ही हा नवा ब्लॉग सुरु केलाय. खरंतर काही मराठी वेबसाईटस या केवळ ब्लॉगिंगसाठीच सुरु झालेल्या आहेत असं वाटतं. सोशल नेटवर्कींगला बरंच महत्त्व आलंय त्यामुळेही असेल. अशा काही वेबसाईटसवर नियमितपणे येणार्‍या वाचकांची संख्या मोठी आहे. पण गेले काही महिने या अशा वेबसाईटसवर काहीतरी धुसफुस चालू आहे असं जाणंवतं. स्पष्ट कोणी बोलत नाही पण तरीही पडद्याआड सगळंच काही स्वच्छ नाही. इथे आम्हाला कोणावर टिकाही करायची इच्छा नाही आणि कोणाची बाजूही घ्यायची नाही. पण जे जाणंवलं ते स्पष्टपणे लिहिणं बोलणं चांगलं असं वाटतं.

मराठीसृष्टीवर आपण या आणि इथे काहीही लिहा. वेगवेगळे विषय निवडा. फक्त एकच पथ्थ्य पाळा. एकमेकांवर वैयक्तिक टिका करणं टाळा. असे लिखाण आम्हाला या वेबसाईटवरुन काढून टाकावे लागेल ज्याचे आमच्याबरोबरंच आपल्यालाही दुःख होईल.

आपल्याला अनेकदा बरीच इ-मेल येतात. त्यात काही चांगली माहिती असते. कधी टिप्स असतात, कधी विनोद असतात, कधी फोटो असतात तर कधी आणखी काही. आपण हीच मेल्स पुढे फॉरवर्ड करतो. मराठीसृष्टीवर अशा मेल्समधील माहिती ठेवा आणि सगळयांना इथली फक्त लिंक द्या. त्यांचे मेलबॉक्स भरायची गरजच नाही. काही सॅम्पल्स इथे ठेवत आहोत.

चला तर मग. लिहायला सुरुवात करा…….